शिरोळ तालूक्यात घोसरवाड,तेरवाड,अकिवाट व कुरूंदवाड येथे कोरोना बाधीत रुग्ण जिल्ह्यातील संख्या 182

आरोग्य कोल्हापूर

शिरोळ तालुक्यात आज आणखी चार रुग्णांची भर पडली. तेरवाड येथील 22 वर्षीय, अकिवाट येथील 26 वर्षीय तरुण तर घोसरवाड येथील 43 वर्षीय आणि कुरुंदवाड येथील 26 वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. जिल्ह्यात बुधवारी आणखी 46 नवे रुग्ण आढळून आले. यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 182 पर्यंत पोहोचली आहे. शाहूवाडी तालुक्यात सर्वाधिक रुग्ण आढळून येत असून आज तालुक्यातील आकडा 50 वर गेला.

शाहूवाडी हॉटस्पॉटच्या दिशेने

जिल्ह्यात आजअखेर आढळलेल्या रुग्णांत सर्वाधिक 50 रुग्ण शाहूवाडी तालुक्यात झाले आहेत. आज दिवसभरात शाहूवाडी तालुक्यात आणखी 13 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.

बारीवणे येथील 20 वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यासह उदगिरी येथील 25 वर्षीय पुरुष, भडगाव येथील 24 वर्षीय पुरुष, गजापूर येथील 34 वर्षीय महिलेलाही कोरोनाची बाधा झाली आहे. शिरगावमधील 25 वर्षीय महिलेला आणि 20 वर्षीय पुरुषालाही कोरोनाची लागण झाली आहे. मानोली येथील 23 वर्षीय पुरुष, शाहूवाडीतील 42 वर्षीय पुरुष तसेच 26 वर्षीय महिला आणि 17 वर्षीय युवतीही कोरोनाग्रस्त झाली आहेत. यासह शाहूवाडीतील 30 आणि 21 वर्षीय तरुणाला लागण झाली आहे. शिराळे येथील 23 वर्षीय पुरुषाचा अहवालही पॉझिटिव्ह आला आहे. वाढत्या रुग्णसंख्येने शाहूवाडी तालुक्याची वाटचाल हॉटस्पॉटकडे चालली आहे.

दिगस येथे आणखी चार रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये 30 वर्षीय महिला, 14 वर्षीय युवक, 30 वर्षीय तरुणासह दोन वर्षाच्या बालकाचाही समावेश आहे. हसणे येथील 23 आणि 22 वर्षीय तरुणांना लागण झाली आहे.दुबळेवाडी येथील 24 वर्षीय तरुण, कासारवाडा येथील 54 वर्षीय पुरुष, पनोरी येथील 45 वर्षीय पुरुषाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. चौके मानबेट येथील 34 व 30 वर्षीय दाम्पत्यासह 25 वर्षीय महिलेला लागण झाली आहे.

पन्हाळ्यातही आज तीन रुग्णांची भर पडली. यामध्ये 30 वर्षांची महिला, 10 वर्षांचा मुलगा यासह पणुत्रे येथीलही दहा वर्षांच्या मुलाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. करवीर तालुक्यातील 37 आणि 31 वर्षीय तरुणांना लागण झाली आहे. आजरा तालुक्यातील बहिरेवाडी येथील एक वर्षाच्या बालिकेलाही कोरोनाची बाधा झाली आहे. कोल्हापूर शहरातील 37 वर्षीय तरुणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

रात्री उशिरा आणखी तिघांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये यांनी सांगितले. त्याचा तपशील उशिरापर्यंत समजू शकला नाही.

फराळेत एकाच कुटुंबातील 5 बाधित

राधानगरी तालुक्यात आज दिवसभरात 18 रुग्ण आढळून आले. सकाळी आलेल्या अहवालात मोघर्डे येथील एकाच कुटुंबातील 13 वर्षीय मुलाचा आणि 27 वर्षीय महिलेचा समावेश आहे. फराळे येथील 50 वर्षीय पुरुषाचाही अहवाल पॉझिटिव्ह आले. रात्री आणखी 14 जण बाधित असल्याचे आढळून आले. त्यात सकाळी फराळे येथील 50 वर्षीय पुरुषाची 45 वर्षीय पत्नी, 24 व 21 वर्षीय मुलासह कुटुंंबातील 52 वर्षीय महिला अशा पाच जणांना लागण झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *