महात्मा फुले जीवनदायी योजनेत सर्व जनता समाविष्ट मंत्री हसन मुश्रीफ: रुग्णांना चांगली सेवा द्या, कोल्हापूरसह जिल्ह्यातील ४४ दवाखान्यांचा समावेश

आरोग्य बिझनेस महाराष्ट्र

महात्मा फुले जीवनदायी योजनेत सर्व जनता समाविष्ट
मंत्री हसन मुश्रीफ: रुग्णांना चांगली सेवा द्या, कोल्हापूरसह जिल्ह्यातील ४४ दवाखान्यांचा समावेश

कोल्हापूर, दि.८:

महा विकास आघाडीच्या सरकारने महाराष्ट्रातील सर्वच आर्थिक स्तरातील नागरिकांसाठी नव्याने विस्तारीत महात्मा फुले जीवनदायी आरोग्य लागू केली आहे . सर्वच म्हणजे केशरी रेशनकार्ड धारकासह अगदी पांढऱ्या रेशन कार्डधारकांनासुद्धा पाच लाखापर्यंतचे उपचार यामध्ये मोफत मिळणार आहेत . कॅशलेशच्या रूपात महाराष्ट्र शासनाने घेतलेला हा एक महत्त्वपूर्ण ऐतिहासिक निर्णय आहे. कारण या योजनेच्या माध्यमातून अगदी छोट्या-छोट्या आजार विकारापासून ते मोठमोठ्या आजार व विकारांपर्यंत अगदी सरकारी दवाखान्या मधून मिळणारे उपचार सुद्धा खाजगी दवाखान्यात मधून मोफत मिळणार आहेत. युनायटेड इन्शुरन्स कंपनीच्या सहयोगातून राज्यांमध्ये सुरू झालेली ही योजना पंधराशे कोटी रुपयांची आहे.
ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.

पत्रकात पुढे म्हटले आहे , ज्यावेळी महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे महाआघाडी सरकार कार्यरत होते, त्यावेळी राजीव गांधी जीवनदायी योजना कार्यरत होती. गेल्या सरकारने या योजनेचे नामकरण महात्मा फुले जीवनदायी योजना असं केलं. त्याच नावाने या योजनेचा आता पुन्हा विस्तार केलेला आहे. सर्वच आजार समाविष्ट असलेल्या या नव्या आणि विस्तारित योजनेचा फायदा राज्यातील सर्वच नागरिकांना मोठ्या प्रमाणात होणार आहे.

योजनेअंतर्गत विविध आजारांवरील सरकार आणि इन्शुरन्स कंपनीने ठरवलेले दर आहेत, त्यानुसारच आकारणी करावी . गोरगरिबांची आणि विशेषता रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा याच भावनेने ही सेवा करावी…..

या योजनेत कोल्हापूर जिल्ह्यातील जे दवाखाने समाविष्ट आहेत, त्यांची यादी सोबत देत आहोत. दरम्यान ; कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यातील काही मोठे दवाखाने याआधी या योजनेत समाविष्ट होते. परंतु सरकारच्या तपासणीमध्ये काही त्रुटी आढळून आल्यानंतर त्यांची सेवा बंद केलेली आहे. या आणि इतर सर्व हॉस्पिटल्सनी या योजनेत नव्याने समाविष्ट व्हावे. तसेच सरकारने जे आजारनिहाय उपचाराचे दर घालून दिलेले आहेत. त्याप्रमाणे आकारणी करून जनतेची सेवा करावी.

रुग्णसेवेत खंड पडल्याचे दुःख……. मंत्री श्री मुश्रीफ यांनी म्हटले आहे, कोरोना संसर्गामुळे लॉकडाऊन व संचार बंदीमुळे गेली पंधरा वीस वर्ष सुरू असलेली नियमित रुग्णसेवा मी करू शकलो नाही. याबद्दल जिल्ह्यातील जनतेची आणि समस्त रुग्णांची मी माफी मागतो . गेल्या पंधरा वर्षापासून अखंडपणे मी मुंबईतील चारिटी दवाखान्यांमध्ये दर आठवड्याला 15 ते 20 पेशंट घेऊन उपचार करून आणून घरी सोडतो. परंतु ; दुर्दैवाने जगाबरोबरच कोरोना विषाणू भारत आणि आपल्या राज्यात हि पसरतच गेला. परिणामी, राज्यात लॉकडाऊन आणि संचारबंदी लागू झाली. दुर्दैवाने मुंबईतील ही सेवा गेल्या दोन महिन्यांपासून मला बंद करावी लागली. या गोष्टीचे मला अतिव दुःख आहे. कारण; कॅन्सर, मेंदू, मणका, किडनी , लिव्हर किंवा असे जे महाभयानक रोग आहेत, त्या रुग्णांना फार मोठा आधार या मुंबईमधील उपचारांचा होता. कोरोणा संसर्गाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या लॉकडाऊन आणि संचारबंदीमुळे या जनतेची सेवा आम्ही करु शकलो नाही. या रुग्ण सेवेच्या नियमित कामावरच माझा आठ ते दहा लोकांचा स्टाप होता. त्यांची सेवा गेल्या दोन महिन्यांपासून बंद आहे. मला मुंबईमध्ये मंत्री म्हणून मलबार हिलला सरकारने देऊ केलेला बंगलाही मी नाकारला आणि मंत्रालयासमोरील बंगला घेणे मी पसंत केलं . ज्यामध्ये दोन खोल्या या निव्वळ रुग्णांसाठी आहेत. दुर्दैवाने बंगल्यामध्ये जाण्याआधीच लॉकडाऊन झालं आणि ही सेवा मी करू शकलो नाही. महाराष्ट्र शासनाने आणलेल्या या विस्तारित महात्मा फुले जीवनदायी योजनेचा लाभ घेऊ या. माझ्या फाउंडेशन मार्फत रुग्णांच्या सेवेसाठी जे जे जे लोक आहेत ते हेच पूर्णवेळ काम करतील.

ज्या रुग्णांना ताप , सर्दी, खोकला किंवा कोरोनाची लक्षणे आहेत ते रुग्ण सरकारी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी जातील. बाकीच्या सर्व आजारांवर डॉक्टरानी कुणालाही सेवा नाकारू नये. या योजनेअंतर्गत सर्व ते उपचार करावेत.

●महात्मा फुले जीवनदायी योजनेत समाविष्ट कोल्हापूर जिल्ह्यातील हॉस्पिटल्सची नावे अशी…..

कोल्हापूर शहर:
ॲपल हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूट, अथायु मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल,
कॉन्टॅकेअर आय हॉस्पिटल,
डायमंड सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल,
डॉ .डी .वाय .पाटील हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूट,
जोशी हॉस्पिटल अँड डायलिसिस सेंटर,
कोल्हापूर कॅन्सर सेंटर,
केपीसी मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल प्रा. लि.,
कोल्हापूर इन्स्टिट्यूट ऑफ ऑर्थोपेडिक्स अँड ट्रामा -केआयओटी,
मगदूम इंडो सर्जरी इन्स्टिट्यूट,
मसाई हॉस्पिटल,
राजर्षी छत्रपती शाहू मेडिकल कॉलेज अँड सीपीआर हॉस्पिटल,
सावित्रीबाई फुले हॉस्पिटल,
सिद्धिविनायक नर्सिंग होम,
सिद्धगिरी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर,
सिद्धिविनायक हार्ट फाउंडेशन,
सनराइज् हॉस्पिटल,
स्वस्तिक हॉस्पिटल,
टूलिप हॉस्पिटल,
वारणा इन्स्टिट्यूट ऑफ युरो सर्जरी,
ओम साई ओंको सर्जरी हॉस्पिटल,
गांधिनगर उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय ,
सेवा रुग्णालय.

जिल्ह्यातील इतर दवाखान्याची नावे अशी:

इचलकरजी-
अलायन्स मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल,
निरामय हॉस्पिटल,
इंदिरा गांधी स्मृती -आयजीएम हॉस्पिटल,

जयसिंगपूर-
माने केअर हॉस्पिटल,
हिरेमठ हॉस्पिटल,
संजीवनी मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल,

गडहिंग्लज-
कै. केदारी रेडेकर हॉस्पिटल,
देसाई हॉस्पिटल,
गडहिंग्लज उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय,
संत गजानन महाराज हॉस्पिटल -महागाव.

गिरीजा हॉस्पिटल -पेठ वडगाव,
रुदया मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल हेरले,
रामकृष्ण चरीटेबल ट्रस्ट दवाखाना- घोटवडे,
शतायु मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर- शिरोळ,
यशवंत धर्मार्थ रुग्णालय -कोडोली,
सद्गुरू बाळुमामा ट्रस्ट हॉस्पिटल- आदमापूर,
कुडाळकर हॉस्पिटल -पेठ वडगाव,
राधानगरी ग्रामीण रुग्णालय,
कोडोली उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय,
संजीवन हॉस्पिटल एंड क्रिटिकल केअर युनिट -पन्हाळा.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *