शहरातील सर्व दुकाने आजपासून सम-विषम तारखांना उघडणार

कोल्हापूर बिझनेस

शहरातील प्रमुख मार्ग आणि बाजारपेठांत सम-विषम तारखांना सर्वच दुकाने उघडण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱयांनी मंगळवारी जाहीर केला. विविध व्यापारी संघटनांच्या बैठकीत रस्त्याच्या दुतर्फा जर दुकाने असतील तर एक बाजू सुरू अन् दुसऱया बाजूची दुकाने बंद, या मार्गावर वाहनांच्या पार्किंगचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला.

लॉकडाऊनच्या तिसऱया टप्प्यात कोल्हापूर जिल्हा ऑरेंज झोनमध्ये आहे. तेथे अत्यावश्यक सेवेसह सर्वच दुकानांना परवानगी दिली आहे. ग्रामीण भागात मॉल वगळता सर्व दुकाने सुरू ठेवण्याचा आदेश जिल्हा प्रशासनाने काढला आहे. पण महापालिका आणि नगरपालिका क्षेत्रात एकाच मार्गावर कापड दुकाने, सराफी दुकाने, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स दुकाने असल्याने दुकाने उघडताना संभ्रमावस्था होती. त्यामुळे चेंबर ऑफ कॉमर्सच्या नेतृत्वाखाली 55 संघटनांनी जिल्हाधिकाऱयांशी चर्चा केली. त्याचे नियोजन मंगळवारी दुपारी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना सादर केले. या बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली. बैठकीला जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख, महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, आमदार चंद्रकांत जाधव उपस्थित होते.

चेंबरचे अध्यक्ष संजय शेटय़े म्हणाले, प्रशासनाच्या आदेशानंतर सद्यस्थितीत 70 टक्के दुकाने सुरू आहेत. पण शहरातील गुजरी, महाद्वार रोड, राजारामपुरी, भाऊसिंगजी रोड, चप्पललाईन, पानलाईन आदी ठिकाणी सर्वच दुकाने उघडणे अवघड झाले आहे. तसेच नियमानुसार अंमलबजावणी करण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे लक्ष्मीपुरीत ग्रेन मर्चट असोशिएशनने केलेल्या नियोजनानुसार अन्यत्र नियोजन करावे. सम-विषम तारखांना मार्गाच्या दुतर्फा असलेली दुकाने उघडावीत, त्यानुसार वाहन पार्किगचे नियोजन करण्याची मागणी केली.

आयुक्त डॉ. कलशेट्टी यांनी पुण्याप्रमाणे कोल्हापुरातही 1 किलोमीटर मार्गावर 5 दुकाने उघडण्याचा पर्याय सांगितला. व्यापाऱयांनी कोल्हापुरात 1 किलोमीटरची व्यापारी पेठ नसल्याचे सांगितले. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी व्यापाऱयांचे नियोजन पहा आणि निर्णय घ्या, असे सांगितले. शहरातील दारू दुकानांसमोर असलेली गर्दी पाहता त्यांनाही सम-विषम तारखांच्या नियोजनात आणा, असे आमदार चंद्रकांत जाधव यांनी सांगितले. त्यानंतर जिल्हाधिकारी देसाई यांनी बुधवारपासून शहरातील प्रमुख बाजारपेठा, महाद्वार रोड, गुजरी, भाऊसिंगजी रोड, लक्ष्मीपुरी, शाहूपुरी आदी मार्गावर सम-विषम तारखांना दुकाने उघडण्याचा निर्णय दिला. जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. देशमुख यांनी एका बाजूची दुकाने उघडल्यास दुसऱया बाजूची दुकाने बंद राहतील. त्या दुकानांसमोर पार्किंग राहील, असे नियोजन करण्यास सांगितले. त्यानुसार बुधवारपासून अंमलबजावणी होणार आहे.

बैठकीला कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष संजय शेटे, उपाध्यक्ष शिवाजीराव पोवार, संजय पाटील, माजी अध्यक्ष आनंद माने, प्रदीपभाई कापडीया, मानद सचिव धनंजय दुग्गे, जयेश ओसवाल, खजानीस हरीभाई पटेल, संचालक अजित कोठारी, भरत ओसवाल, कुलदीप गायकवाड, जयंतभाई गोयाणी, सराफ संघाचे अध्यक्ष भारत ओसवाल, प्लायवुड असोशिएशनचे अध्यक्ष संजय पाटील, टिंबर असोशिएशनचे अध्यक्ष हरीभाई पटेल, स्टोन ट्रेडर्स असोशिएशनचे धनंजय दुग्गे, इलेक्ट्रिकल असोशिएशनचे अजित कोठारी, स्मॅक संघटनेचे अतुल पाटील, गोशिमाचे अध्यक्ष सचिन शिरगावकर, कोल्हापूर इंजिनिअरींग असोशिएशनचे अध्यक्ष अतुल आरवाडे, चेंबर ऑफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष आनंद माने आदी उपस्थित होते.

कारवाईझाल्याससंघटनाजबाबदारनाहीत

या सर्व सुचनांचे वेळेचे तंतोतत पालन आवश्यक आहे. यात त्रुटी आढळल्यास  संबंधितांवर कायदेशीर कारवाई झाल्यास  चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज व तिच्या सर्व संलग्न संघटना अजिबात जबाबदार राहणार नाहीत, असा इशारा चेंबरच्या पदाधिकाऱयांनी दिला आहे.

व्यापाऱयांसाठीयाआहेतमार्गदर्शकसुचना

प्रत्येक मालकाने व कर्मचाऱयाने तोंडाला मास्क लावणे अत्यावश्यक आहे.

दुकानाबाहेर एक मीटरच्या अंतराने चौकोन, बॉक्स आखावेत.

मास्क लावलेल्या ग्राहकांना सॅनिटायझर देऊनच दुकानामध्ये प्रवेश द्यावा.

काऊंटर व ग्राहक यांच्यामध्ये देखील एक मीटरचे अंतर ठेवण्यासाठी दोरी अथवा टेबलची व्यवस्था करावी.

दुकान नेहमी सॅनिटायझर करुन स्वच्छ ठेवावे.

सर्व कर्मचाऱयांसाठी आरोग्य सेतू ऍप डाऊनलोड करुन घ्यावे.

दुकानदाराने दुकान व दुकानाबाहेर ग्राहकांची अनावश्यक गर्दी होणार नाही, याची दक्षता घ्यावी.

प्रशासनाने ठरवून दिलेल्या नियमावलीचे पालन करावे.

दुकानेउघडण्याचाप्रस्तावसादरबैठकीतनिर्णय

पालकमंत्री सतेज पाटील व आमदार चंद्रकांत जाधव यांच्या सुचनेनुसार कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या सर्व संलग्न संघटनांच्या प्रतिनिधींबरोबर चर्चा झाली. त्यानुसार केलेला प्रस्ताव मंगळवारी आमदार चंद्रकांत जाधव यांच्यासमवेत जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना देण्यात आला. यावेळी झालेल्या बैठकीला आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी, पोलीस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख उपस्थित होते.

पुर्वदक्षिणबाजूचीसमतरपश्चिमउत्तरबाजूचीदुकानेविषमतारखेला

जिल्हा प्रशासनाने शहरातील व्यापारी आस्थापने (औषध दुकाने सोडून) रस्त्याच्या पूर्व आणि दक्षिण बाजूची दुकाने (आस्थापने) सम तारखेस सुरु राहतील व त्याचप्रमाणे रस्त्याच्या पश्चिम आणि उत्तर बाजूची दुकाने (आस्थापने) विषम तारखेस सरु राहतील. यामधून औषध दुकानांना सुट दिली आहे. चर्चेअंती या प्रस्तावाला सर्वानुमते मान्यता देण्यात आली. त्यानुसार बुधवारपासून शहरातील आस्थापना रस्त्याच्या पूर्व आणि दक्षिण बाजूची दुकाने (आस्थापने) सम तारखेस सुरु राहतील तर रस्त्याच्या पश्चिम आणि उत्तर बाजूची दुकाने (आस्थापने) विषम तारखेस सुरु राहतील, असे प्रशासनाने स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *