कोल्हापूर : ‘शहरातील दुकाने एक दिवासाआड सुरु करा’

कोल्हापूर बिझनेस

कोल्हापूर शहरातील दुकाने एक दिवस आड ठेऊन सूरू करा, त्यासाठी चेंबर ऑफ कॉमर्सने पुढाकार घ्यावा. सरसकट सर्व दुकाने सूरू होणार नाहीत, असे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी व्यापाऱ्यांचा शिष्टमंडळाला सांगितले. लॉकडाऊननंतर ४२ दिवसांनी सोमवारी काही दुकाने सूरू झाली, पण महापालिकेने दुकाने बंद करा नाहीतर कारवाई करणार असे सांगितले.

याबाबत व्यापारी शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी देसाई यांची भेट घेतली. काही व्यापाऱ्यांनी एक दिवस आड दुकान सूरू करणे शक्य नाही, त्यामुळे व्यापाऱ्यांनी याला विरोध दर्शविला. ग्रामीण भागात सर्व सुरू होते. मग शहरातील व्यापाऱ्यांवर अन्याय कशासाठी अशी भूमिका घेतली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *