राज्य सरकारचा मोठा निर्यय! रेड झोनमध्येही कंटेनमेंट झोन वगळता दारु विक्रीची परवानगी

कोल्हापूर बिझनेस महाराष्ट्र राजकीय

राज्य सरकारने लॉकडाऊन मधील नियमांमध्ये बदल केला असून रेड झोनमध्येही काही नॉन इसेन्शियल दुकानांना परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार आता मुंबई, पुण्यात देखील वाईन शॉप सुरू राहणार आहेत. मात्र, मॉल, हॉटेल, रेस्टोरेंट्स मध्ये दारू मिळणार नाही. पूर्वी रेडझोनमध्ये जीवनावश्यक गोष्टी वगळता कशलाही परवानगी नव्हती. यात आता सरकारने शिथिलता आणली आहे. मात्र, यासाठी कडक नियमावली जाहीर केली आहे.

केंद्र आरोग्य मंत्रलयाने महाराष्ट्रात झोननुसार जिल्ह्याची यादी जाहीर केली होती. त्यानंतर राज्यानेही झोन निहाय जिल्ह्यांची यादी जाहीर केली. मात्र, राज्यानेही केंद्राच्याच यादीवर शिक्कामोर्तब केलेले दिसून येत आहे. शनिवारी कुठल्या झोननुसार काय सुरू होणार याची नियमावली राज्य सरकारने काही जाहीर केली होती. या नियमांमध्ये सरकारने आता शिथिलता आणली आहे. यानुसार आता रेड झोन मधील कंटेनमेंट झोन वगळता इतर भागात नॉन इसेन्शियल दुकानांना परवानगी देण्यात आली आहे.

काय आहेत नवीन नियम
रेड झोन मधील कंटेनमेंट झोन वगळता इतर भागात नॉन इसेन्शियल दुकानांना परवानगी.
स्पा, सलून, याबद्दल अद्याप निर्णय झालेला नाही.
एका लेनमध्ये फक्त पाच दुकाने उघडी ठेवण्याची परवानगी देण्यात आली.
राज्यात मुंबई, पुणे शहरातही वाईन शॉप सुरू राहणार.
सर्व दुकानदार आणि ग्राहकांनी सोशल डिस्टन्स पाळणे गरजेचे.
मॉल, हॉटेल्स, रेस्टोरेंट्समध्ये दारू मिळणार नाही.
अत्यावश्यक दुकाने सगळी सुरू राहणार, त्यात बदल नाही.

यापूर्वीची झोननुसार नियमावली

रेड झोन

  • बस, रिक्षा, टॅक्सी बंद राहणार
  • सलून बंद राहणार
  • ग्रामीण भागातील सर्व दुकाने नियम पाळून खुली करण्याचा निर्णय
  • मात्र ग्रामीण भागातील मॉल सुरू होणार नाही
  • रेड झोनमधील महापालिका क्षेत्र मुंबई, MMR, पिंपरी चिंचवड, पुणे, मालेगाव वगळून इतर शहरांमधील सर्व प्रकारची दुकान सुरू होणार
  • वरील महापालिका क्षेत्र वगळून इतर क्षेत्रात खासगी कार्यालय 33 टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सुरू होणार
  • सरकारी कार्यालयात उपसचिव आणि त्यावरील अधिकाऱ्यांची 100 टक्के उपस्थिती असणार
  • त्याखालील कर्मचाऱ्यांची 33 टक्के उपस्थिती अपेक्षित
  • रेड झोनमधील 14 जिल्हे
  • मुंबई, मुंबई उपनगर जिल्हा, ठाणे, सातारा, पालघर, पुणे, नागपूर, सोलापूर, औरंगाबाद, धुळे, जळगाव, नाशिक, अकोला, यवतमाळ.

ऑरेंज झोन

  • बस वाहतूक बंद राहणार
  • टॅक्सी, रिक्षा सेवा सुरू होणार
  • एक वाहक आणि दोन प्रवासी अशी परवानगी
  • खासगी कार्यालय 33 टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सुरू होणार
  • सरकारी कार्यालयात उपसचिव आणि त्यावरील अधिकाऱ्यांची 100 टक्के उपस्थिती असणार
  • त्याखालील कर्मचाऱ्यांची 33 टक्के उपस्थिती अपेक्षित
  • अत्यावश्यक सेवांसह आता इतर दुकान सुरू होणार (मॉल सोडून)
  • ऑरेंज झोनमधील 16 जिल्हे
  • रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली, रायगड, अहमदनगर, बीड, जालना, हिंगोली, लातूर, अमरावती, बुलडाणा, चंद्रपूर, भंडारा, नांदेड, परभणी, नंदूरबार.

ग्रीन झोन

  • सगळं सुरु करायला परवानगी
  • 50 टक्के प्रवासी क्षमतेने ग्रीन झोनमध्ये बस सेवा सुरू होणार
  • बसच्या फेऱ्या ग्रीन झोनमध्येच असणार त्याच्या क्षेत्राबाहेर बस जाणार नाही
  • खासगी कार्यालय 33 टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सुरू होणार
  • सरकारी कार्यालयात उपसचिव आणि त्यावरील अधिकाऱ्यांची 100 टक्के उपस्थिती असणार
  • तर त्याखालील कर्मचाऱ्यांची 33 टक्के उपस्थिती अपेक्षित
  • ग्रीन झोनमधील 6 जिल्हे
  • सिंधुदुर्ग, उस्मानाबाद, गोंदिया, वाशिम, वर्धा, गडचिरोली.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *