मोठी बातमी; लॉकडाऊनमुळे अडकलेले मजूर आणि विद्यार्थ्यांना सोडण्यासाठी धावणार विशेष ट्रेन

महाराष्ट्र राजकीय

नवी दिल्ली – कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे लाखो मजूर तसेच इतर लोक देशातील विविध ठिकाणी अडकून पडले आहेत. दरम्यान, या सर्वांना दिलासा देणारी बातमी आली आहे. लॉकडाऊन दरम्यान, परराज्यात अडकून पडलेले मजूर, कर्मचारी, विद्यार्थी यांना त्यांच्या घरी सोडण्यासाठी विशेष ट्रेन सोडण्याच्या निर्णयास केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. 

याबाबत माहिती देताना गृहमंत्रालयाने सांगितले की,’लॉकडाऊनमुळे विविध ठिकाणी अडकून पडलेले मजूर आणि विद्यार्थ्यांना सर्व सुरक्षाविषय उपायांसह त्यांच्या राज्यात सोडण्यासाठी विशेष ट्रेन सोडण्यासाठी परवानगी दिली आहे.’ काही दिवसांपूर्वी केंद्र सरकराने लॉकडाऊनमुळे अडकलेल्या मजुरांना त्यांच्या त्यांच्या राज्यात सोडण्यासाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या होत्या. त्यानंतर बऱ्याच राज्यांनी मजुरांना परत आणण्यासाठी विशेष ट्रेन सोडण्याची मागणी केली होती. लॉकडाऊनमुळे हातावर पोट असलेले अनेक मजूर देशातील विविध भागात अडकून पडले आहेत. तसेच यापैकी अनेक जण मिळेल त्या मार्गाने आपल्या घरी परतण्यासाठी प्रयत्न करत आहेत. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *