आमदार प्रकाश आवाडे यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांची घेतली भेट

इचलकरंजी/प्रतिनिधी –इचलकरंजी येथील मध्यवर्ती बसस्थानकाचे ‘छत्रपती शिवाजी महाराज मध्यवर्ती बसस्थानक’ असे नामकरण करावे या मागणीसंदर्भात मंगळवारी आमदार प्रकाश आवाडे यांच्या नेतृत्त्वाखाली अखिल भारतीय मराठा महासंघाच्या पदाधिकार्‍यांनी मुंबईत परिवहन मंत्री अनिल परब यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी मंत्री परब यांनी सकारात्मक प्रतिसाद देत या प्रश्‍नी लवकरच एक व्यापक बैठक घेऊन निर्णय घेऊन अशी ग्वाही दिली.इचलकरंजी […]

Continue Reading

समाजसेवेतील योगदानाबद्दल जि.प.सदस्य राहुल आवाडे यांना ‘डॉक्टरेट’

इचलकरंजी/प्रतिनिधी –समाजसेवेतील बहुमूल्य योगदानाबद्दल युवानेते जिल्हा परिषद सदस्य राहुल प्रकाश आवाडे यांना कॉमनवेल्थ वोकेशनल युनिव्हर्सिटी किंगडम टोंगा यांच्याकडून ‘डॉक्टरेट’ पदवी प्रदान करण्यात आली. युनिव्हर्सिटीचे उपकुलगुरु रिपूरंजन सिन्हा व विश्‍वस्त डॉ. आनंदेश्‍वर पांडे यांच्या हस्ते ही उपाधी प्रदान करण्यात आली.गोवा येथील हयात सेंट्रीक कँडोलिम येथे हा सोहळा पार पडला. गत चारवर्षापासून राहुल आवाडे हे रेंदाळ जिल्हा […]

Continue Reading

नदीकाठावरील गावांनी सामंजस्यातून मार्ग काढून इचलकरंजीच्या दुधगंगा पाणी पुरवठा योजनेला परवानगी द्यावी – आमदार प्रकाश आवाडे

इचलकरंजी/प्रतिनिधी –दुधगंगा नदीतून इचलकरंजीसाठी केवळ पिण्याचे पाणी उचलले जाईल. सुळकुडच्या हक्काच्या पाण्याला कोणताही धक्का लागू देणार नाही. म्हणूनच सुळकूडसह नदीकाठावरील गावांनी सामंजस्यातून मार्ग काढून इचलकरंजीच्या दुधगंगा पाणी पुरवठा योजनेला परवानगी द्यावी, असे आवाहन आमदार प्रकाश आवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली हुपरी येथे संपन्न सर्वसमावेशक बैठकीत करण्यात आले. तर या संदर्भात सुळकूड ग्रामस्थांची मते जाणून घेण्यासह भविष्यात उपासबंदी […]

Continue Reading

गांधर्व महाविद्यालय मंडळाची कथ्थक नृत्य विशारद पदवी प्राप्त केल्याबद्दल कु. सृष्टी चंद्रशेखर शहा हिचा सन्मान

पदन्यास नृत्यकला अकादमी या संस्थेच्यावतीने नृत्य विशारद सन्मान आणि नृत्यकला गौरव समारंभ संपन्न इचलकरंजी/प्रतिनिधी –पदन्यास च्या माध्यमातून आणि सौ. सायली होगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली गांधर्व महाविद्यालय मंडळाची कथ्थक नृत्य विशारद पदवी प्राप्त केल्याबद्दल कु. सृष्टी चंद्रशेखर शहा हिला अ. भा. गांधर्व महाविद्यालय मंडळाचे सचिव बाळकृष्ण विभुते, नगराध्यक्षा अ‍ॅड. सौ. अलका स्वामी, ज्येष्ठ रंगकर्मी श्रीकांत फाटक, डॉ. […]

Continue Reading

गोल्डन फ्रेंडस क्लब यांच्यावतीने महारक्तदान शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद

इचलकरंजी/प्रतिनिधी –गावभागातील गोल्डन फ्रेंडस क्लब यांच्यावतीने शिवजयंती निमित्त रामजानकी हॉल येथे घेण्यात आलेल्या महारक्तदान शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबीरात जवळपास 150 दात्यांनी रक्तदान केले.या शिबीराचा शुभारंभ आमदार प्रकाश आवाडे, अप्पर पोलिस अधिक्षक जयश्री गायकवाड, जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे आणि सौ. मौश्मी आवाडे यांच्या हस्ते करण्यात आला. विशेष म्हणजे या शिबीरात महिलांसह मोठ्या संख्येने […]

Continue Reading

मुख्याध्यापिका गोंदकर यांना ‘विशेष शैक्षणिक सेवा गौरव पुरस्कार’

’इचलकरंजी/प्रतिनिधी –कर्नाटक राज्यातील नॅशनल रुरुल डेव्हलपमेंट फाऊंडेशन आणि हेल्थ नेचर डेव्हलपमेंट सोसायटी यांच्यावतीने देण्यात येणारा यंदाचा ‘विशेष शैक्षणिक सेवा गौरव पुरस्कार’ येथील माजी नगराध्यक्षा तथा श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल अ‍ॅन्ड ज्युनिअर कॉलेजच्या मुख्याध्यापिका श्रीमती सुप्रिया सुरेश गोंदकर यांना जाहीर करण्यात आला आहे.हा आंतरराज्य पुरस्कार वितरण सोहळा 28 मार्च रोजी बेळगांव येथे होणार आहे. या सोहळ्यासाठी […]

Continue Reading

कल्लाप्पाण्णा आवाडे को-ऑप. इंडस्ट्रियल इस्टेट अ‍ॅण्ड इंटिगे्रटेड टेक्स्टाईल पार्क (मल्टिस्टेट) चेअरमनपदी प्रकाश दत्तवाडे आणि व्हा. चेअरमनपदी बाळासाहेब कलागते यांची निवड

इचलकरंजी/प्रतिनिधी –येथील कल्लाप्पाण्णा आवाडे को-ऑप. इंडस्ट्रियल इस्टेट अ‍ॅण्ड इंटिगे्रटेड टेक्स्टाईल पार्क (मल्टिस्टेट) या संस्थेची सन 2021-2026 सालची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी अरुण काकडे यांनी बुधवारी संस्थेच्या विशेष सभेत ही घोषणा केली. दरम्यान, सभेनंतर झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत चेअरमनपदी प्रकाश ज्ञानबा दत्तवाडे आणि व्हा. चेअरमनपदी बाळासाहेब गणपती कलागते यांची निवड करण्यात आली.संस्थापक […]

Continue Reading

इचलकरंजीत एका युवकाचा निर्घृण खून

इचलकरंजी/प्रतिनिधी –हातकणंगले तालुक्यातील कोरोची येथील खूनाच्या घटनेला 24 तास उलटण्यापूर्वीच  बुधवारी इचलकरंजीत एका युवकाचा निर्घृणपणे खून करण्यात आल्याची घटना उघडकीस आली. शांतीनगर परिसरातील कत्तलखान्याच्या पिछाडीस असलेल्या निर्जनस्थळी एखादी जड वस्तू घालून हा खून करण्यात आला आहे. त्याच्या चेहर्‍याचा चेंदामेंदा केल्याने ओळख पटविण्यात पोलिसांना अडचणी येत आहेत. सलग दोन दिवसात दोन खूनाच्या घटना घडल्याने शहरात खळबळ […]

Continue Reading

मानसिक व शारिरिक छळ करण्यासह जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी विनय सत्यनारायण राठी याच्यावर गुन्हा नोंद

इचलकरंजी/प्रतिनिधी –व्यवसाय करण्यासाठी माहेरुन 10 लाख रुपये आणावेत आणि घटस्फोट द्यावा या मागणीसाठी मानसिक व शारिरिक छळ करण्यासह जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी विवाहितेने दिलेल्या फिर्यादीवरुन पतीवर शहापूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सौ. मयुरी विनय राठी (वय 27 रा. गैबान पेट्रोल पंपाच्या मागे एमजी मार्केट शहापूर) हिने दिलेल्या तक्रारीवरुन विनय सत्यनारायण राठी […]

Continue Reading

कोरोनामुक्त इचलकरंजी शहरात पुन्हा कोरोनाचा शिरकाव, एकून रूग्णांची संख्या 7

इचलकरंजी/प्रतिनिधी –कोरोनामुक्त इचलकरंजी शहरात गत काही दिवसांपासून पुन्हा कोरोनाचा शिरकाव झाला असून प्रशासनाकडून शहरवासियांना सतर्कचे आवाहन केले जात आहे. मात्र हॉटेल्स, सांस्कृतिक भवन, मंगल कार्यालये, आठवडी बाजार, मध्यवर्ती बसस्थानक आदी ठिकाणी शासन नियमांची पायमल्ली केली जात असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे प्रशासनाने थेट दंडात्मक कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली असून त्यासाठी विविध पथकांची नेमणूक केली […]

Continue Reading