वारसा हक्काने मिळणार्‍या नियुक्तीचा लाभ चतुर्थ श्रेणीतील संवर्गांत समाविष्ट सर्वच पदांना मिळणे गरजेचे – आमदार प्रकाश आवाडे

इचलकरंजी/प्रतिनिधी –वारसा हक्काने मिळणार्‍या नियुक्तीचा लाभ चतुर्थ श्रेणीतील संवर्गांत समाविष्ट सर्वच पदांना मिळणे गरजेचे आणि न्याय आहे. या संदर्भात सामाजिक न्याय विभाग आणि नगरविकास मंत्री यांच्याकडे पंधरा दिवसात बैठक घेऊन हा प्रश्‍न निश्‍चितपणे सोडवू, अशी ग्वाही आमदार प्रकाश आवाडे यांनी दिली.सेवानिवृत्त, स्वेच्छानिवृत्त अथवा सेवेत असताना निधन झालेल्या अनुसुचित जातीतील कर्मचार्‍यांच्या वारसांना वारसा हक्क योजनेचा लाभ […]

Continue Reading

चोरट्यांनी बंद घरात घुसून 20 हजाराच्या रोकडसह 1 लाख 22 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने असा 1 लाख 42 हजार रुपयांचा मुद्देमाल केला लंपास

इचलकरंजी/प्रतिनिधी –बंद घराचा कडी-कोयंडा उचकटून तेथील पोटमाळ्यावरुन शेजारच्या घरात घुसून चोरट्यांनी 20 हजाराच्या रोकडसह 1 लाख 22 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने असा 1 लाख 42 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. जवाहरनगर परिसरात ही घटना घडली. या प्रकरणी मल्लिकार्जुन चंद्रशेखर गंजार (वय 26) याने शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, फिर्यादी मल्लिकार्जुन […]

Continue Reading

सर्वंकष कामगिरीसाठी कोल्हापूर आणि नाशिकला ग्राम स्वच्छतेसाठी राष्ट्रीय पुरस्कार

नवी दिल्ली, दि. : स्वच्छ भारत अभियान (ग्रामीण)अंतर्गंत सर्वंकष आणि सातत्यपुर्ण उत्कृष्ट कामगिरीसाठी कोल्हापूर आणि नाशिक जिल्ह्यांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. जागतिक शौचालय दिनाचे औचित्य साधून केंद्र सरकारच्या पेयजल व स्वच्छता मंत्रालयाच्यावतीने दूरदृष्य प्रणालीच्यामाध्यमातून सरपंच संवाद आणि पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंग शेखावत आणि राज्यमंत्री रतनलाल कटारिया व […]

Continue Reading

बेकायदेशीररित्या गुटख्याची वाहतूक करणारी मोटार शिवाजीनगर पोलिसांनी पकडली ;सुमारे 5 लाख 19 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

इचलकरंजी/प्रतिनिधी –बेकायदेशीररित्या गुटख्याची वाहतूक करणारी मोटार शिवाजीनगर पोलिसांनी पकडली. या प्रकरणी अमोल अरुण लोळगे (वय 40 रा. वाणी पेठ, पेठवडगांव) याला अटक केली. शेळके मळा ते लिंबू चौक या रस्त्यावर ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत विविध कंपन्यांचा 2 लाख 19 हजार रुपयांचा गुटखा, मोटार आदींसह सुमारे 5 लाख 19 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात […]

Continue Reading

उत्तर भारतीयांनी छटपुजा घरीच साजरी करावी

इचलकरंजी/प्रतिनिधी –संपूर्ण देशभरात निर्माण झालेल्या कोविड महामारीच्या संकटामुळे यावर्षी पंचगंगा नदी घाटावर साजरी करण्यात येणार्‍या छटपुजेसाठी शासनाने मनाई केली आहे. त्यामुळे सर्व समाजबांधवांनी छटपुजा आपापल्या घरीच साजरी करावी असे आवाहन उत्तर भारतीय जनसेवा संघाच्यावतीने करण्यात आले आहे.दरवर्षी उत्तर भारतीयांच्यात सुर्यषष्ठी व्रत व छट पुजा साजरी केली केली जाते. या पुजेसाठी पंचगंगा नदीघाटासह सार्वजनिक तलावाच्या ठिकाणी […]

Continue Reading

पुणे पदवीधर मतदार संघांमध्ये साखर सम्राट व शिक्षण सम्राट यांचा पराभव करून विद्यार्थी, शिक्षक, कामगार व पदवीधर यांच्यासाठी कार्य करणाऱ्या उमेदवारांना निवडून द्या!

सांगली :पुणे पदवीधर मतदार संघांमध्ये साखर सम्राट व शिक्षण सम्राट यांचा पराभव करून विद्यार्थी, शिक्षक, कामगार व पदवीधर यांच्यासाठी कार्य करणाऱ्या उमेदवारांना निवडून द्या!आपण अनुभव घेत आहोत की, साखर सम्राट ऊसतोड कामगारांना किमान वेतन देत नाहीत,शेतकऱ्यांच्या ऊस दराला योग्य भाव देत नाहीत ,स्वतःच्या कारखान्यातील कंत्राटी कामगारांना कायम करत नाहीत,त्यांना किमान वेतनानुसार सुद्धा पगार देत नाहीत […]

Continue Reading

पतंजली योगपीठ हरिद्वार यांच्यावतीने कोल्हापूर जिल्ह्यात ऑनलाईन सह योगशिक्षक प्रशिक्षण शिबीर संपन्न

इचलकरंजी/प्रतिनिधी –पतंजली योगपीठ हरिद्वार यांच्यावतीने कोल्हापूर जिल्ह्यात घेण्यात आलेल्या ऑनलाईन सह योगशिक्षक प्रशिक्षणाची नुकतीच सांगता झाली. यामध्ये इचलकरंजीतील सौ. प्राची चोथे यांनी प्रथम, सौ. पुष्पा मोरे यांनी द्वितीय आणि अमृता सिंह यांनी तृतीय क्रमांक मिळविला. या योगशिक्षकांनाकोल्हापूर जिल्ह्यामध्ये पतंजली योगपीठ हरिद्वार तर्फे ऑनलाईन सह योग शिक्षक प्रशिक्षण घेणेत आले. तर पतंजली योग समिती कोल्हापूरचे सह […]

Continue Reading

राज्यातील उच्चदाब शैक्षणिक व खाजगी वसतिगृहांवर जादा वीजदर आकारणी;योग्य आकारासाठी आयोगासमोर याचिका दाखल – प्रताप होगाडे

इचलकरंजी/प्रतिनिधी –राज्यातील उच्चदाब जोडणी असलेली बिगर शासकीय व खाजगी सर्व प्रकारची वसतिगृहे, तसेच खाजगी शाळा व महाविद्यालये यांच्याशी संलग्न असलेली सर्व विद्यार्थी वसतिगृहे आयोगाच्या नवीन आदेशानुसार 1 एप्रिलपासून सार्वजनिक सेवा अन्य या कमी वीज दराने आकारणी होण्यासाठी पात्र आहेत. तथापि त्यांच्यावर अद्यापही लघुदाब घरगुती या जादा वीज दराने आकारणी केली जात आहे. त्याचप्रमाणे भूमिगत व्यवस्था […]

Continue Reading

दिवाळीच्या लाडू चकलीच्या आस्वाद बरोबरच दिवाळीचा बौद्धिक खुराक म्हणजेच सत्यशोधक दिवाळी अंक – कविवर्य पाटलोबा पाटील

कुरुंदवाड: येथील शेकाप कार्यालय येथे सत्यशोधक चळवळ महाराष्ट्राच्या वतीने गेली चार वर्ष सातत्यपूर्ण उठावदार असा वाचनीय दिवाळीचा विशेषांक बौद्धिक खुराक देणारा म्हणजेच सत्यशोधक दिवाळीअंक होय असे मत ज्येष्ठ साहित्यिक कवी पाटलोबा पाटील यांनी सत्यशोधक दिवाळी विशेषांकाच्या प्रकाशनाच्या कार्यक्रमावेळी व्यक्त केले. तर सर्वजन सुखाय सर्वजन हिताय प्रमाणेच कामगारांच्या समस्या व कामगारांचे हित जोपासणारे इचलकरंजीचे ज्येष्ठ कामगार […]

Continue Reading

चाळीस मिनिटाचे चार तास विद्यार्थ्यांचे शिक्षण हाच ध्यास! शिक्षण मंत्री, प्रा . वर्षा गायकवाड.

मुंबई : महाराष्ट्र राज्य भौगोलिक दृष्ट्या पुर्णपणे वेगळा आहे. कोरोनाचा प्रार्दुभाव ही जिल्हा – जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी कमी अधिक प्रमाणात आहे. अशा वेळी शिक्षण चालू करणे आव्हानात्मक असले तरी विद्यार्थ्यांचे आरोग्य व शिक्षण याला विचारात घेऊनच शिक्षण विभागाने नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी […]

Continue Reading