हसूर बुद्रुक येथे युवकाची आत्महत्या…
सेनापती कापशी (प्रतिनिधी) : हसूर बुद्रुक (ता. कागल) येथील काकासाहेब शांताराम बोटे (वय ४०) यांनी जोगू झऱ्याजवळील जंगलात सागाच्या झाडाला दोरीने गळफास लावून घेऊन आत्महत्या केली. या घटनेची मुरगूड पोलिसांत नोंद झाली आहे. कोरोनो दक्षता समिती आणि पत्नीबरोबर वाद झाल्यानंतर नैराश्यातून त्यांनी आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे.
Continue Reading