Wednesday, July 15, 2020

आंबेडकरांचे निवासस्थान ‘राजगृह’ वरील भ्याड हल्ल्याचा निषेध : पँथर सेना

सांगली : राज्यात अनुसूचित जाती-जमातीच्या, बौद्ध लोकांवर जातीयवादी हल्ले वाढत आहेत. यावर सरकारचा कसलाच अंकुश नाही. तसेच आंबेडकरी जनतेचे अस्मिता असलेले आंबेडकर भवनची तोडफोड, तसेच भिमा कोरेगाव दंगल जाणीवपूर्वक घडवून आणले जात आहेत. मंगळवारी अज्ञात हल्लेखोरांनी जगातील आंबेडकरी जनतेची अस्मिता असलेल्या राजगृहावर हल्ला केला. राजगृहावरील हल्ल्यामुळे आंबेडकरी जनतेमध्ये संतापाची लाट पसरलेली आहे. राजगृह हे देशाचे […]

राजकीय

वीज बिले माफ करण्याची जनता दलाची मागणी

मुंबई, दि. ७ : देशात आणि राज्यात टाळेबंदी (लॉकडाऊन) लागू करण्यात आली त्याला आता १०० दिवस लोटले आहेत. या काळात रोजीरोटीच बंद असल्याने उदरनिर्वाह करताना गरीब, कष्टकरी, मध्यमवर्गीय या सर्वांचीच आता दमछाक झाली आहे. त्यामुळे दरमहा ३०० युनिटसच्या आत वीज वापर असणाऱ्या राज्यातील सर्व घरगुती वीज ग्राहकांची मागील तीन महिन्यांची देयके माफ करावीत, अशी मागणी […]

राज्यातील 2 कोटी घरगुती वीज ग्राहकांच्या वीज वापराची बिले अंदाजापेक्षा जास्त; ग्राकातून तीव्र नाराजी

इचलकरंजी | राज्यातील अंदाजे 2 कोटी घरगुती वीज ग्राहकांच्या घरगुती वीज वापराची बिले ग्राहकांच्या अंदाजापेक्षा जास्त आलेली आहेत. त्यामुळे प्रचंड संभ्रम व असंतोष निर्माण झालेला आहे. प्रत्यक्षात या बिलांतील वाढीची दोन प्रमुख कारणे आहेत. पहिले कारण नैसर्गिक असून मार्च ते जून पूर्णपणे उन्हाळा कालावधी आणि लॉकडाऊन मुळे कुटुंबातील सर्वजण घरात. त्यामुळे सर्व खोल्या मधील दिवे, पंखे, […]

आरोग्य

जिल्हा कारागृहातील कोरोनाची साखळी तोडण्यात प्रशासनाला यश

बंदी आणि कर्मचारी झाले कोरोनामुक्त सोलापूर, दि.13 – सोलापूर जिल्हा कारागृहातील कोरोनाची साखळी तोडण्यात जिल्हा प्रशासनाला यश आले आहे. योग्य खबरदारी घेत केलेल्या प्रभावी उपाययोजनांमुळे सर्व बंदी व कर्मचारी कोरोनामुक्त झाल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली. सोलापूर जिल्हा कारागृह प्रशासनाने कोरोना साथीचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी उपायोजना करून देखील न्यायाधीन बंदी हे कोरोना पॉझिटिव्ह आढळले […]

कोविड-१९ च्या उपचारासाठी लागणाऱ्या रेमडेसिविर, टॉसिलिझुमॅब या औषधांचा काळाबाजार रोखणारअन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांची माहिती

मुंबई, दि.१० : कोविड-१९ च्या उपचारासाठी लागणाऱ्या रेमडेसिविर (Remdesivir) व टॉसिलिझुमॅब (Tocilizumab) या औषधांचा काळाबाजार रोखणार, असे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी आज सांगितले. या विषयाच्या अनुषंगाने गृहमंत्री अनिल देशमुख, यांच्या अध्यक्षतेखाली व अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, यांच्या उपस्थितीत आज बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीत […]

इचलकरंजी : कुडचे मळा परिसरासाठी मोठा दिलासा अकरा जण कोरोनामुक्त

इचलकरंजी : शहरात कोरोना संसर्ग ज्या भागातून सुरू झाला, त्या कुडचे मळा परिसरासाठी मोठा दिलासा मिळाला आहे. या परिसरातील तब्बल अकरा जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या सर्वजण संस्थात्मक अलगीकरणात आहेत. एक-दोन दिवसात ते आपल्या घरी परतणार आहे. शहरात एकीकडे कोरोनाचा कहर सुरू असताना दुसरीकडे कोरोनामुक्तीलाही सुरूवात झाल्यांने इचलकरंजीकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. इचलकरंजी शहरात कुडचे मळ्यातून […]